This content has been archived. It may no longer be relevant

प्रधानमंत्री वय वंदना योजना काय आहे:-

प्रधानमंत्री वय वंदना योजना भारत सरकारची योजना आहे. भारत सरकारतर्फे देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ मार्च २०१७ रोजी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू केली गेली. प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे, पण एलआयसीद्वारे चालविली जात आहे.

pradhanmantri-vaya-vandana-yojana

या योजनेंतर्गत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांनी मासिक पेन्शनची निवड केली आहे, त्यांना दहा वर्षांसाठी ८% व्याज मिळेल आणि जर त्यांनी वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडला, तर त्यांना १० वर्षांसाठी ८.३% व्याज मिळेल. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गुंतवणूकीवर चांगले व्याज मिळेल. या योजनेंतर्गत गुंतवणूकीची कमाल मर्यादा आधी ७.५ लाख होती, जी आता वाढवून १५ लाख करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजना भारतीय जीवन विमा महामंडळ यांनी अमलात आणली आहे. भारताचे सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे फायदे:-

१. जेष्ठ नागरिकांना वर्षिक किंवा मासिक पेन्शन प्रधान करणे.

२. या योजनेअंतर्गत त्यांना नागरिकांनी केलेल्या गुंतवणूकीवर चांगल्या व्याजाने पेन्शन दिली जाते.

३. देशातील ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी होतील आणि त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.

४. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आर्थिक स्वातंत्र्याची स्थिती निर्माण होईल आणि स्वावलंबी भारतालाही चालना मिळेल.

५. १० वर्षांच्या पॉलिसी मुदती दरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर खरेदी किंमत परत दिली जाईल.

६. ही योजना पॉलिसी मुदतीच्या दरम्यान अपवादात्मक परिस्थितीत पॉलिसी सोडण्याची मान्यता देते.

७. ही योजना खरेदी करण्यात किंवा या योजनेद्वारे मिळालेल्या पेन्शन रकमेवर कोणताही कर लाभ/सवलत नाही.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेची वैशिष्ट्ये:-

१. प्रधानमंत्री वय वंदना योज़नेचे व्यवस्थापन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत केले जाते.

२. पेन्शन योजनेचा कालावधी १० वर्षाचा आहे.

३. प्रधानमंत्री वय वंदना योजनेत जेष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते.

४. जीएसटी सर्व्हिस टॅक्स वर १००% सूट मिळवता येते.

५. जास्तीत जास्त १५ लाखाची एकरकमी गुंतवणूक करता येते.

६. १० वर्षाच्या कालावधीत पॉलिसी धारकाच्या मृत्यू झाल्यास वारसदाराला लाभ मिळतो.

७. ६० वर्ष पूर्ण असणारे पती पत्नी दोघेही ३० लाखापर्येंत गुंतवणूक करून रुपये १८,५०० मासिक पेन्शन मिळवू शकतात.

८. पॉलिसी घेतल्यानंतर ३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर शिल्लक रक्कमेच्या ७५% कर्ज सुविधा मिळवता येते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना व्याजदर:-

प्रधानमंत्री वय योजनेचा व्याजदर देशाच्या आर्थिक परिस्थितिनुसार किंचित बदलत असतो. मागील काही वर्षात प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या व्याजदरात घट झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साध्य या योजनेचा व्याजदर मासिक पेन्शनचा पर्याय निवडलायस ८% वरून ७.४५% वर घसरला आहे.

तिमाही सहामाही आणि वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडल्यास अनुक्रमे ७.४५%, ७.५२%, ७.६०% एवढा व्याजदर प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत लाभार्थया प्राप्त होत असतो. पेन्शनची रक्कम निवडलेल्या पर्यायानुसार लाभार्थ्यच्या बँक खात्यात थेट जमा होत असते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना पात्रता:-

१. अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.

२. अर्जदाराचे किमान वय ६० वर्षे असावे. या योजनेंतर्गत कोणतीही वयाची मर्यादा नाही.

पंतप्रधान वंदना योजना कर्ज सुविधा:-

तुम्हाला प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत कर्ज देखील मिळू शकते. हे कर्ज पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षानंतर मिळू शकते. या योजनेअंतर्गत आपल्याला देय रकमेच्या ७५% पर्यंत प्रदान केली जाऊ शकते. या कर्जावरील व्याज दर १०% आकारला जाईल.

पंतप्रधान वंदना योजनेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे:-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वयाचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखल
  • बँक खाते पासबुक
  • रहिवासी पुरावा
  • मोबाइल नंबर

पंतप्रधान वय वंदना योजना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया:-

१.प्रथम अर्जदारास एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्याची लिंक खाली दिलेली आहे. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.

२.या होम पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा पर्याय दिसेल तुम्हाला त्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन संबंधित माहिती भरावी लागेल.

३.त्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावरील योजना पर्यांयावरती क्लिक करावे लागेलत्यामध्ये पेन्शन योजना हा पर्याय निवडावा लागेल.

४.त्यानंतर तुमच्यापुढे पेन्शन योजनेसंबंधीच्या लिंक ओपन होतील त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा या ऑपशनवर क्लिक करायचे आहे.

५.यानंतर हा अर्ज तुमच्यासमोर उघडेल त्यानंतर तुम्हाला नाव पत्ता आधार क्रमांक इत्यादी फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती भराव्या लागतील.

६.सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपले सर्व दस्तऐवज अपलोड करावे लागतील आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपली ऑनलाइन नोंदणी पूर्ण होईल.

Check out the Pradhan Mantri Vaya Vandana Yojana Helpline Number: 022 6781921/ 022 67819290
For the application process and to know more about other schemes you can visit the PM Vaya Vandana Yojana website.