प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

This content has been archived. It may no longer be relevant

आपण सगळेजण विमा का काढतो त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटापासून आर्थिक संरक्षण व्हावे किंवा आर्थिक आधार मिळावा यासाठी काढतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या एलआयसीच्या किंवा इतर कुठल्याही विमा कंपन्यांचे पॉलिसी प्लान उपलब्ध आहेत. परंतु काही विमा प्लॅनचे प्रीमियम ते अत्यंत मोठ्या रकमेच्या असतात. नवीन सर्वसामान्य लोकांना जास्त प्रीमियम भरणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी किंवा त्यांना विमा कवच मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे:-

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक भारतातील सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे. याचा मूळ उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारताच्या २०१५ च्या अंदाजपत्रकात फेब्रुवारी २०१५ मध्ये केला होता. याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे कोलकाता येथे ९ मे ला झाले. मे २०१५ ला भारताच्या फक्त २०% लोकांपाशीच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा आहे.या योजनेचे ध्येय हा आकडा वाढवावयाचे आहे.

आजच्या काळात देशाच्या प्रत्येक नागरिकांकडे विमा असणे आवश्यक आहे. मात्र जास्त प्रीमियम असल्याने सर्वांनाच विमा काढणे परवडते असे नाही. यामुळे देशातील गरीब व दुर्बल घटकांचा विचार करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु करण्यात आली. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक महिना फक्त रुपये १ एवढा प्रीमियम भरून रुपये २ लाख पर्येंतचा लाभ घेऊ शकतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना फायदे:-

१. इतर योजनांच्या तुलनेत जास्त खर्च न करता अपघात विमा संरक्षण मिळते.

२. पॉलिसी धारकाचा मृत्यु झाल्यास नामांकित व्यक्तीला पैसे दिले जातात.

३. हि योजना लवचिक तसेच सोईनुसार बंद करता येते.

४. नैसर्गिक आपत्ती किंवा खुनामुळे मृत्यु झाल्यास रुपये २,००,००० एवढी बिमीत रक्कम दिली जाते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वैशिष्ट्ये:-

१. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्यातून हा विमा उतरवू शकतो.

२. लाभार्थीच्या बचत खात्यामधून विम्याची रक्कम प्रतिवर्षी रुपये १२ अधिक सेवाकर ऑटो डेबिट केली जाते.

३. हप्त्याचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असतो.

४. हि योजना एक वर्षेसाठी विमा संवरक्षण देते. एकवर्षाने नूतनीकरण करावे लागते.

५. विमा हप्ता रुपये १२ प्रति व्यक्ती प्रति वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल.

 ६. विमा धारकाने वय वर्ष ७० पूर्ण केल्यावर व बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल किंवा बँक खाते बंद केले तर विमा संवरक्षण संपुष्टात येईल.

पंतप्रधान विमा सुरक्षा योजना पात्रता:-

१. देशातील प्रत्येक १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत बँका खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.

२. विमा उतरावणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक मह्रत्वाचा घटक आहे.

३. लाभार्थीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

४. कोणत्याही बँका, पोस्ट खाते व सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचा लाभ घेता येतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी आवशयक कागदपत्रे:-

१. आधार कार्ड

२. बँक पासबुक

३. वयाचा दाखला

४. उत्पन्नाचा दाखला

५. पासपोर्ट साईज फोटो

६. ओळखपत्र

७. मोबाईल नंबर

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे मिळणारे विमा कवच:-

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जर एखाद्या अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंब किंवा नॉमिनेट व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतात. तसेच अपघातावेळी ती व्यक्ती अर्धवट अपंग असेल तर त्याला एक लाख रुपये दिले जातात तसेच पूर्णपणे अपंगत्व आले तर दोन लाख रुपये पूर्ण दिले जातात.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटी आणि नियम:-

१. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा कालावधी १ वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

२. योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करता येते.

३. अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघात विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल.

४. सुरुवातीला ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांमार्फत उपलब्ध करून दिली जाईल.

५. सहभागी बँका त्यांच्या ग्राहकांसाठी योजनेच्या अंमलबजावणीसाठी अशा कोणत्याही सामान्य विमा कंपनीची सेवा घेण्यास मोकळे आहेत.

६. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थीचे वय १८ ते ७० वर्षे दरम्यान असावे.

७. एखाद्या व्यक्तीचे १ पेक्षा जास्त बचत खाते असल्यास त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ फक्त एकाच बचत खात्यातून मिळू शकतो.

८. विमा संरक्षणाचा कालावधी १ जून ते ३१ मे पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.वार्षिक प्रीमियम भरल्यानंतरच अर्जदाराला योजनेचा लाभ मिळू शकतो.

९. जर कोणत्याही कारणास्तव या योजनेचा लाभार्थी योजना सोडला असेल तर भविष्यात त्याला प्रीमियम भरून या योजनेचा लाभ मिळू शकतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा:-

१. तुम्हाला अर्ज डाऊनलोड करायचा असेल तर तुम्हाला प्रथम पंतप्रधान सुरक्षा या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

२. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.

३.या होम पेजवर तुम्हाला फॉर्म्स चा पर्याय दिसेल तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल.

४.या पेजवर तुम्हाला पंतप्रधान सुरक्षा विमा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.  त्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

५.त्यानंतर अर्जाची PDF तुमच्या समोर उघडेल. तुम्ही अर्जाचा फॉर्म PDF डाउनलोड करू शकता , त्यानंतर तुम्हाला नाव पत्ता आधार क्रमांक ईमेल आयडी इत्यादी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.

६.सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.

७.त्यानंतर तुम्हाला बँकेत अर्ज जमा करावा लागेल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हेल्पलाईन नंबर:- १८००१८०११११/१८००११०००१.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही PM Jeevan Jyoti Bima Yojana site ला भेट देऊ शकता.