This content has been archived. It may no longer be relevant

प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे:-

प्रधान मंत्री मुद्रा योजना ही ८ एप्रिल २०१५ रोजी बिगर कॉर्पोरेट बिगर-शेती छोट्या उद्योगांना १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. या कर्जाचे प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत मुद्रा कर्ज किंवा मुद्रा लोन म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. कर्जदार शासनाने नमूद केलेल्या कोणत्याही कर्ज देणार्‍या संस्थांकडे जाऊ शकतो किंवा या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतो.

pradhan-mantri-mudra-yojana-logo

प्रधान मंत्री मुद्रा योजने च्या तत्वाखाली ‘शिशु’ ‘किशोर’ आणि ‘तरुण’ या तीन प्रकारच्या योजने ची निर्मिती केली आहे जे लाभार्थी मायक्रो युनिट, उद्योजकाची वाढ विकास आणि वित्तपुरवठ्याची गरज दर्शवितात आणि पुढील पातळीसाठी एक संदर्भ बिंदू. अभ्यासाच्या विकासाच्या टप्प्या साठी देखील पुरवले जाते.

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल.

पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला “मुद्रा कार्ड” दिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात केव्हा झाली:-

माननीय अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०१५ – २०१६ मध्ये मुद्रा बँक तयार करण्याची घोषणा केली. त्यानुसार या योजनेची स्थापना केली गेली. कंपनी अ‍ॅक्ट २०१३ नुसार मार्च २०१५ मध्ये कंपनी म्हणून आणि 07 एप्रिल २०१५ रोजी आरबीआयकडे नॉन-बँकिंग फायनान्स संस्था म्हणून स्थापना करण्यात आली. मुद्रा योजनेचा शुभारंभ माननीय पंतप्रधान यांनी ०८ एप्रिल, २०१५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात केला.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वशिष्टे:-

१. मुद्रा योजनेअंतर्गत देशातील ५. ७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य उपलब्ध झाले आहे.

२. वार्षिक ७ टक्के दराने १० लाख पॅरेण्ट अर्थपुरवठा उपलब्ध आहे.

३. मुद्रा योजनेअंतर्गत २० ००० कोटीचे सरकारचे भक्कम भांडवली पाठबळ आहे.

४. सिडबीची हि कंपनी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे:-

१. मुद्रा योजनेद्वारे हमीशिवाय कर्ज दिले जाते.

२. याशिवाय कर्जासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्कही आकारले जात नाही.

३. मुद्रा योजनेत कर्जाची परतफेड कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता येईल.

४. कर्जदाराला मुद्रा कार्ड मिळते ज्याच्या मदतीने व्यवसायाच्या गरजेवर खर्च करता येतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज प्रकार:-

१. शिशु कर्जः शिशु कर्जाखाली ५० रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात.

२. किशोर कर्ज: ५० ते ५ लाख रुपयांपर्यंतची कर्ज किशोर कर्जांतर्गत दिली जाते.

३. तरुण कर्जे: तरुण कर्जाखाली ५ लाख ते १० लाखांपर्यंतची कर्जे दिली जातात.

प्रधानमंत्री मुद्रा योजना ठळक मुद्दे पात्रता:

१. मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही जमिनीची आवश्यकता नाही.

२. मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे गहाण ठेवावे लागत नाही.

३. या योजनेमध्ये स्वतःच्या १०% भांडवलाची आवश्यकता नसते.

४. मुद्रा योजना फक्त सरकारी बॅंकांमध्येच असणार आहे.

५. मुद्रा योजनेअंतर्गत कर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असले पाहिजेच असे नाही.

६. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मागणारा अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-

१. मतदान ओळखपत्र आधार कार्ड इ.

२. वीज बिल घर खरेदी पावती.

३. अर्जदार जो व्यवसाय करणार आहे किंवा करत आहे त्याचा परवाना व स्थायी पत्ता.

४. मागील ६ महिनायचे बँक खात्याचे स्टेटमेंट.

५. विकत घ्यावयाच्या मशिनरी वस्तूंचे बांधकामाचे अंदाजपत्र.

६. व्यवसायासाठी लागणारे मटेरिअल किंवा यंत्रसामग्रीचे कोटेशन.

७. अर्जदाराने ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला आहे त्याचे पूर्ण नाव व पत्ता.

८. अर्जदाराचे फोटो.

प्रधानमंत्री मुद्रा योजना व्याजदर:-

१. स्टेट बँक ऑफ इंडिया- ९.७५%

२. ओरिएन्ट बँक ऑफ कॉमर्स- ८.१५%

३. बँक ऑफ बरोडा – ८.१५%

४. कॉर्पोरेशन बँक- ९.३५%

५. बँक ऑफ महाराष्ट्र- ८.५५%

६. पंजाब नॅशनल बँक- ९.६०%

प्रधानमंत्री मुद्रा योजना बँक यादी:-

  • कॉर्पोरेशन बँक
  • देना बँक  
  • ऍक्सिस बँक  
  • बँक ऑफ बरोडा  
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र  
  • सारस्वत बँक
  • युनाइटेड बँक  
  • इंडियन बँक  
  • कॅनरा बँक

प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया:-

१. सर्वप्रथम आपल्याला मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

२. आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.

३. मुख्य पृष्ठावर आपल्याला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.

४. पंतप्रधान मुद्रा लोन योजनाआता आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये आपल्याला आपले वापरकर्तानाव संकेतशब्द आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.

५. आता आपल्याला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.

६. आपण मुद्रा पोर्टलवर लॉगिन करण्यात सक्षम असाल.

प्रधानमंत्री मुद्रा योजना लोगो:-

प्रधानमंत्री मुद्रा योजना हेल्पलाईन नंबर:- १८०० १८० ११११.
प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाईन संकेतस्थळ:- PM Mudra Yojana.