प्रधानमंत्री जन धन योजना

This content has been archived. It may no longer be relevant

देशातील प्रत्येक नागरिकाकडे एक बँक खाते असावे त्याना बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी व या सरकारी योजनेचा आर्थिक लाभ लोकांच्या थेट बँक खात्यात जमा व्हावा तसेच विमा संरक्षण व इतर अर्थिक व्यवहार सुराक्षित होण्याच्या उद्देशाने दिनांक २८ ऑगस्ट २०१४ ला प्रधानमंत्री जन धन योजना संपूर्ण देशात राबवण्याची घोषणा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली.

प्रधानमंत्री जन धन योजना विशेषतः समाजातील दुर्बल घटकांसाठी अतिशय लाभदायक योजना आहे. प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजे बँकिंग वित्तीय सेवा होय. या योजनेचा राष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहारात सर्वांचा समावेश व्हावा यासाठी राबवलेली केंद्रपुरस्कृत योजना आहे.

प्रधानमंत्री जन धन योजना काय आहे :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक समावेशनाच्या उद्दीष्टाने पंतप्रधान जन धन योजना 2014 मध्ये सुरू केली होती. या योजनेचा प्राथमिक हेतू हे आहे की कमकुवत आणि निम्नवर्गाचे लोक हे सुनिश्चित करतात.उत्पन्न गट राष्ट्रीय स्तरावर वित्तीय सेवांमध्ये प्रवेश करू शकतो. उद्घाटनाच्या छायेत सर्व व्यक्तींना आणणे हे त्याचे उद्दीष्ट आहेबँक खाते. पीएमजेडीवायच्या माध्यमातून व्यक्ती बँकिंग, सेव्हिंग्ज आणि डिपॉझिट अकाउंट, रेमिटन्स, पेन्शन आणि यासारख्या सेवांमध्ये प्रवेश करू शकतात.

प्रधानमंत्री जन धन योजनेचे फायदे :-

१. कोणत्याही बँकेमधून झीरो बॅलन्स बँक खाते उघडता येते म्हणजेच किमान रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक नाही.

२. खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते.

३. बँकेतील ठेवीवर व्याज मिळते.

४. लाभार्थीना रु.२,००,००० रुपयांचा अपघात विमा मिळतो.

५. भारतभर मोफत निधी हस्तांतरण होते.

६. सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना या खात्यामधून थेट लाभ मिळतो.

७. सहा महिन्यापर्यंत या खात्यात समाधानकारक व्यवहार झाल्यास ओव्हरड्राफ्ट ची सुविधा दिली जाईल.

प्रधानमंत्री जन धन योजनेची वैशिष्ट्ये :-

१. वित्तीय साक्षरता वाढून संघटीत वित्तसंस्थाकडून होणारा पतपुरवठा वाढविणे.

२. ग्रामीण भागातील वित्तीय समावेशनाला गती लाभेल.

३. वित्तीय अस्पृश्यता कमी कारणे.

४. सूक्ष्म विमा सेवांचा पाया विस्तृत करणे.

५. आगामी काळातील नियोजित थेट लाभ हस्तांतरण योजनासाठीचा पाया जलद गतीने उभारला जात   वाढविणे.

प्रधानमंत्री जन धन योजना पात्रता :-

१. या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक घेऊ शकतात.

२. १० वर्षांपेक्षा कमी वयाची अल्पवयीन मुलेसुद्धा या योजनेंतर्गत खाते उघडण्यास पात्र आहेत.

३. तथापि अल्पवयीन मुलांसाठी खाती पालकांकडून व्यवस्थापित केली जातात.

प्रधानमंत्री जन धन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

जर संबंधित व्यक्तीकडे आधार कार्ड असेल तर इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. जर पत्ता बदललेला असेल तर सध्याच्या पत्त्याचे घोषणापत्र. जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर खालीलपैकी कोणत्याही वैध्य कागदपत्राची आवश्यकता असेल.

१. मतदार ओळखपत्र

२. ड्रायविंग लायसन्स

३. पॅन कार्ड, पासपोर्ट

प्रधानमंत्री जन धन योजनेची ऑनलाईन नोंदणी :-

१. या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी प्रथम जवळील बँकेतील जन धन खाता फॉर्म भरणे आवश्यक आहे.

२. हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन देखील भरू शकता.

३. सदर फॉर्म मध्ये असलेली संपूर्ण माहिती भरावी.

४. या फॉर्म सोबत आधार कार्डची झेरॉक्स जोडावी.

५. त्यानंतर हा फॉर्म ऑनलाईन किंवा जवळील बँकेत सादर करावा.

प्रधानमंत्री जन धन योजना नियम :-

१. भारतात राहणारा १० वर्षावरील कोणताही नागरिक जन धन खाते उघडू शकतो.

२. लाभार्थीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

३. अपघात विमा संरक्षण फायदा मिळण्यासाठी रूपे कार्डचा वापर ४५ दिवसातून एकदा तरी करावा लागतो.

४. जन धन खात्यात कोणताही मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक नाही.

५. पण चेकबुक ची सुविधा घेतली असेल तर मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे.

६. ओव्हरड्राफ्टची सुविधा प्राप्त होण्यासाठी ६ महिन्यनपर्यंत समाधानकारक व्यवहार होणे आवश्यक आहे.

धानमंत्री जन धन योजना बॅंकिंगच्या छत्रछायेत आणण्यासाठीच्या उपाययोजना:-

1.ओळख आणि रहिवासाचा एकच पुरावा

2.तात्पुरता पत्ता म्हणून वेगळा पुरावा देण्याची आवश्यकता नाही

3.खाते स्थलांतरीत करताना पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही

4.ज्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यांच्यासाठी लघु खाते योजना

5.कमी जोखमीच्या ग्राहकांसाठी सवलती

6.खात्याचे अद्ययावतीकरण करण्याच्या कालावधीत बदल

7.इतर सवलती

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय:-

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे जनधन खात्यातून १० ००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट करू शकतो. म्हणजेच खात्यात पैसे नसतानाही किंवा खात्यात शिल्लक असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम काढता येते. या रक्कमेवर बँकेकडून व्याजदर आकारणी होते. परंतु हि सुविधा खरे ओपन केळ्यानंतर काही महिन्यनी मिळते.

प्रधानमंत्री जन धन योजना हेल्पलाईन क्रमांक :-  ८००११०००१, १८००१८०११११.
प्रधानमंत्री जन धन योजना ऑनलाईन संकेतस्थळ :-  PMJanDhanYojana