प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहेः-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमिन असणाऱ्या शेतकरी लोकांचे उत्पन्न वाढण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१. १२. २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या कुटुंबाला प्रति हप्ता रुपये २,000 म्हणजेच वार्शिक ६,000 रुपये अर्थिक मदत केली जाते. या योजनेत पुढे सरकारने बदल करून सरसकट सर्वाना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकारने नियम शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत वाढ झाली. शेतकरी कुटुंबाची २ हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरली. अट शिथिल केल्यामुळे राज्यातील सव्वा कोटी शेतकरी लोकांना याचा फायदा होणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे फायदेः-
१. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकरी लोकांचा फायदा होत आहे.
२. या योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तिंच्या बँक खात्यावर रोख रक्कम जमा केली जाते.
३. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत देशातील कोटयावधी शेतकरी कुटुंबाना वर्षाला ६००० रूपये मिळतात.
४. शासन हि रक्कम त्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करते.
५. या योजनेमुळे शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्नात थोडी भर पडते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची वैशिष्ट्ये:-
१. प्रधानमंत्री किसान निधी योजना शेतकरी कुटुंबाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
२. या योजनेअंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना लाभ व्हावा हा मुख्य व महत्त्वाचा हेतू आहे.
३. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते.
४. या योजनेच्या माध्यमातून देशातील योतकरी व्यक्तींना सन्मान मिळवून दिला जातो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी आवश्यक पात्रता:-
१. सदर योजनेचा लाभ केवळ भारतीय शेतकरीच उठवू शकतो.
२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांकडे स्वतः चे बँक खाते असणे गरजेचे आहे.
३. पहिले या योजनेचा लाभ फक्त २ हेक्टरी जमीन असलेल्या शेतकरी बांधवांना देण्यात येत होता. मात्र आता या योजनेचा लाभ सर्व भारतीय शेतकरी बांधव घेऊ शकतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-
१. खसरा खतौनी व जमिनीची कागदपत्रे
२. शेतकरी क्रेडीट कार्ड
३. बॅंकेचे खाते पासबुक
४. आधार कार्ड
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ऑनलाईन नोंदणीः-
१. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी निधी योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रथम PMSammanNidhi ची वेबसाईट ओपन करा.
२. त्यानंतर उजवीकडे फार्मर कॉर्नर ला क्लिक केल्यावर New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करा.
३. त्यानंतर नवीन पान येईल त्यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
४. यापुढे येणारी माहिती तुम्हाला भरावी लागते. सर्व माहिती भरून झाली की तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन सादर करू शकता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादीः-
१. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ भारतातील सर्व घेवू शकतात.
२. ही योजना केवळ शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात आलेली आहे.
३. या योजनेसाठी लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःची जमिन असावी लागते.
४. या योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर, इ. लोक घेवू शकत नाहीत.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ कोणाला मिळत नाहीः-
१. या योजनेच्या अनुसार शेतकरी कसत असलेली जमिन त्याच्या वडिलांच्या किंवा भावाच्या तर त्याला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
२. भूमीधारक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
३. राज्य केंद्र सरकारचे अधिकारी किंवा कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
४. डॉक्टर, इंजिनियर, सीए, आर्किटेक, वकिल यासारख्या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेवू शकत नाहीत.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना हप्ताः-
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी बांधवाच्या बॅंक खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा केले जातात. वर्षाला ६००० प्रमाणे ३ हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी २००० रुपये जमा केले जातात.