एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

This content has been archived. It may no longer be relevant

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, केंद्र सरकारने २००५-०६ साली एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची सुरुवात केली आहे. केंद्र शासनाचे शेतकऱ्यांसाठी हे एक महत्वाकांक्षी धोरण आहे. अभियान कालावधीत देशातील फलोत्पादन शेतीचे उत्पन्न दुपट्ट व्हावे हेच केंद्र सरकारचे या योजनेमागचा प्रमुख त्यासाठी उद्दिष्ट आहे. त्यासाठी नविन फळबागांची लागवड शेतकऱ्यांनी करणे शेड्नेटहाऊस च्या साहाय्याने नियंत्रित शेती करणे शेती गुणवत्तापूर्ण फळबाग लागवड साहित्य निर्माण करणे सामुहिक शेततळयांच्या अंतर्गत सिंचनाची क्षमता वाढविणे एकात्मिक अन्नद्रव्ये व एकात्मिक कीड व्यवस्थापन मनुष्यबळ विकास जुन्या फळबागांचे पुनरूजीवन करणे तसेच काढणीत्तोर व्यवस्थापन इ. बाबींसाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य करणार आहे.

सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे नविन फळबागांची लागवड करणे जुन्या फळबागांचे पुनरूजीवन करणे सामुहिक शेततळयांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे हरितगृह शेड्नेटहाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे एकात्मिक अज्ञद्रव्ये व एकात्मिक कोड व्यवस्थापन सेंद्रिय शेती मनुष्यबळ विकास काढणीतोर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. सन २०१४-१५ पासुन केंद्रशासनाने सदरचे कार्यक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत (M|DH) राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची उद्दिष्टे:-

  • विकसित आणि आधुनिक रोपवाटिकांची निर्मिती करणे.
  • उतीसंवर्धन प्रयोगशाळा पुनरुज्जीकरण
  • गुणवत्तापूर्ण व आधुनिक लागवड साहित्य आयात करणे.
  • फुलांचे उत्पादन करणे.
  • मसाला पिकांच्या लागवडीस प्राधान्य देणे.
  • फलोत्पादन यांत्रिकीकरण. नवीन बागांची निर्मिती करणे.
  • भाजीपाला लागवड प्रोत्साहन देणे.
  • मोसंबी आंबा कागदी लिंबू पेरू संत्री आवळा मोसंबी काजू इ. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादनात वाढ करणे.
  • फलोत्पादन यांत्रिकीकरण
  • शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबींवर या योजनेअंतर्गत अनुदान आहे.
  • शासकीय किंवा खासगी किंवा सहकारी क्षेत्रासाठी फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा स्थापन करणे.
  • बियाणे प्रक्रिया साठवण भाजीपाला इत्यादी पायाभूत सुविधा.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची वैशिष्ट्ये:-

१. उत्पादक तें अंतिम उपभोक्तापर्यंत फलोत्पादनाच्या विनियोगासाठी उत्पादक काढ्णींतॉर हाताळणी प्रक्रिया व पणन व्यवस्था तसेच उपभोक्ता यामध्ये साखळी निर्माण करून उत्पादकांना अधिकाधिक मोबदला मिळेल याची खात्री करणे.

२. उत्पादन काढणीतोर हाताळणी प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विंकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या वापरासाठी प्रोत्साहून देणे.

३. पेंक हाऊस रायपनिंग चेंबर शीतगृह नियंत्रित वातावरणातील साठवणूकगृह या सारख्या काढणीतर सुविधा तसेच मुल्यवृधींसाठी प्रक्रिया सुविधा आणि पणन अशा प्रकारच्या सुविधा स्थापन करण्यासाठी

४. अर्थसहाय्य करणे.

५. संशोधन आणि विकास प्रक्रिया आणि पणन या क्षेत्रात कार्यरत

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याची पात्रता:-

१. ७/१२ प्रमाणपत्र आणि ८-अ प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

२. जात प्रमाणपत्र जर शेतकरी अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल तर आवश्यक आहे.

३. आधारकार्ड असावे.

४. शेततळे अस्तरीकरणासाठी ५०० मायक्रॉनची प्लास्टिक फिल्म वापरणे बंधनकारक असेल.

५. वैयक्तिक शेतकरी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे गरजेचे असणार आहे.

६. दगड खाणी जुने शेततळे विहीर नैसर्गिक खड्डा इत्यादी जागांवर सामूहिक किंवा वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण मंजूर देण्यात येणार नाही.

७. सामूहिक शेततळे यायोजनेसाठी लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली उस्मानाबाद अकोला अमरावती वाशीम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया व भंडारा व कोकण विभागातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अर्जदार पात्र राहतील.

८. सामूहिक शेततळे या घटकाकरीता राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील अर्जदार पात्र राहतील. मात्र उपरोक्त २५ जिल्हे वगळता इतर जिल्यांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना सामूहिक शेततळे हा घटक अनुज्ञेय राहणार नाही.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:-

  • आधार कार्ड
  • ८-अ प्रमाणपत्र
  • ७/१२ उतारा
  • खरेदी करावयाच्या उपकरणांचे कोटेशन/ बिल
  • आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र

Here, we cover a small piece of information about the एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. For more information visit the National Horticulture Yojana official website. Stay tuned to get notified about the other Government schemes.